हुपरी येथील अवैध मदरशावर कारवाई करण्याची मागणी…..

हातकणंगले तालुक्यातील सरकार गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी क्षेत्र ‘हेक्टर ११ आर्’ची जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक ४४८९ च्या मिळकतीवर ‘मुस्लिम सुन्नत जमियत’ संघटनेने अवैधपणे मदरसा उभारला आहे.
या ठिकाणी वीज आणि पाणी यांची जोडणी असून कूपनलिकाही खोदण्यात आली आहे. या संदर्भात अनेक वेळा निवेदन देऊनही त्यावर कार्यवाही झालेली नाही.

त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून या अवैध मदरशावर तात्काळ कारवाई करण्याचा आदेश द्यावा, या मागणीचे निवेदन हुपरी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. नितीन काकडे यांनी २२ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना ते कोल्हापूर येथे कार्यक्रमासाठी आले असतांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन तहसीलदार सैपन नदाफ यांनी स्वीकारले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. ऋषिकेश साळी आणि श्री. ऋषिकेश दिवाण उपस्थित होते.