सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे. नवरात्रात खी शक्ती, नारी शक्तीची उपासना केली जाते. शहरातील सांगोला यमाई महिला भजनी मंडळाच्या संचालिका साधना कुलकर्णी यांचा सन्मान ठोंबरे परिवारातर्फे मनिषा ठोंबरे यांनी केला. श्री पांडुरंगाची मूर्ती वारकरी भजनी सांप्रदायाचे प्रतीक म्हणून भेट देण्यात आली.
तसेच स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून खण- नारळाने ओटी भरण्यात आली. सध्या नवरात्र उत्सवात दररोज विविध ठिकाणी भजन सेवेचे आयोजन केले जात आहे. काल मंगळवारी अशोका केटरर्स यांचे निवास स्थानी यमाई भजनी मंडळाच्या बैठकीत साधना कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले.