‘बिग बॉस’ च्या घरात खुलतंय प्रेम, ‘या’ दोन स्पर्धकांच्या लव्हस्टोरीची रंगतेय चर्चा

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय आणि तेवढाच वादग्रस्त रिॲलिटी शोची सध्या चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होत आहे. १५ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस १७’ला सुरूवात झाली असून यंदाच्या सीझनमध्ये घरात १७ स्पर्धकांनी एन्ट्री केली. कधी भांडण, कधी धमाल मस्ती तर कधी कोणाची काळजी घेणारे हे स्पर्धक सध्या त्यांच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आले आहेत.

‘बिग बॉस 17’ सुरू होऊन अजून एक आठवडा झाला नाही तोच या घरामध्ये लव्हस्टोरीला सुरुवात झाली आहे. मुनव्वर फारुकी आणि मनारा चोप्रा या दोघांमध्ये प्रेमाचं नातं फुलायला सुरुवात झाली आहे.

अनेक स्पर्धकांनी घरामध्ये एन्ट्री करताच आपल्या सहकाऱ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली होती. त्यामध्ये मुनव्वर आणि मनाराचेही नाव आवर्जुन घ्यावे लागेल. पहिल्या दिवसापासून हे दोघेही एकमेकांना आपण किती चांगले आहोत हे पटवून देताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’ने कन्फेशन रुममध्ये बोलावल्यावरही ते एकमेकांचं नाव घेतल्यानंतर लाजताना दिसून आले. सध्या जरीही अशी चर्चा सुरु आहे, असं दिसत असलं तरी त्यांच्या लव्हस्टोरीची प्रचंड चर्चा होत आहे.

मनारा आणि मुनव्वरची लव्हस्टोरी जरीही नुकतीच सुरु झाली असली तरी, या कपलला नेटकरी ‘ब्यूटी ॲंड ब्रेन कपल’ म्हणून बोलत आहेत. मुनव्वर हा बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला आणि महागडा स्पर्धक आहे. ‘बिग बॉस 17’मध्ये मुनव्वर स्वत:ला टॉप ५ स्पर्धकांमध्ये त्याला त्याचे चाहते पाहत आहेत. त्यासोबतच सध्या सोशल मीडियावर मुनव्वरने फक्त बिग बॉसच्या घरामध्ये स्वत:च्या खेळावर लक्ष केंद्रित करावे, प्रेमात पडू नये, असा सल्ला सध्या चाहते देत आहेत.