सोलापूरकरांसाठी गुड न्यूज!

सोलापूर-पुणे दरम्यान ई-शिवाई बस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आता शनिवार (दि. 30) नोव्हेंबरपासून सहा बसच्या माध्यमातून सोलापूर-लातूर-सोलापूर मार्गावर ही ई- शिवाई बसची सेवा सुरू होणार असल्याने सोलापूरकरांचा प्रवास आरामदायी आनंदी होणार आहे. सोलापूर ते लातूर मार्गांवर बस धावणार आहे. या बसेस सोलापूर-तुळजापूर-उजनी औसा-लातूर परत अशा नियमित धावतील.

या बसेस सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असतील. प्रत्येक अर्ध्या तासाला सोलापूरहून लातूरपर्यंत बस सेवा उपलब्ध असेल. इलेक्ट्रिक बस ही संपूर्ण एसी राहील. प्रवाशांना जलद, सुरक्षित व आरामदायी असा प्रवास असेल. तरी प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

असे आहे वेळापत्रक

सोलापूर ते लातूर सकाळी 06.00 पासून सायंकाळी 05.30 पर्यंत एकूण 12 फेऱ्या

लातूर ते सोलापूर सकाळी 09.00 पासून सायंकाळी 09.00 पर्यंत एकूण 12 फेऱ्या