नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. महावितरणमध्ये बंपर भरती सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीमध्ये (MSEDCL)468 जागांसाठी भरती सुरु असून या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवून आता 19 एप्रिल करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन लगेचच अर्ज दाखल करा. महावितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक अकाऊंट्स (Junior Assistant Accounts) पदांवर भरती सुरु आहे.
पद : कनिष्ठ सहाय्यक लेखा
रिक्त पदांची संख्या : 468 पदे
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : 19 एप्रिल 2024
शैक्षणिक पात्रता
महावितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा पदांसाठी इच्छुक उमेदवाराची शैक्षणिक पात्रता B.Com किंवा BMS किंवा BBA किंवा संबंधित पदवी असणे आवश्यत आहे. याशिवाय MSCIT कोर्स पूर्ण असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
महाराष्ट्र राज्य वितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा पदासाठी पात्र उमेदवाराचे वय 30 वर्षे आहे. उमेदवाराचे वय 29 डिसेंबर 2023 पर्यंत 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय गटातील उमेदवाराला वयोमर्यादेमध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येईल.
अर्जाचे शुल्क
या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी 500 रुपये अर्ज शु्ल्क भरावे लागेल. मागासवर्गीय उमेदवाराला अर्ज शुल्कात सूट देण्यात आल्याने त्यांना फक्त 250 रुपये शुल्क भरावे लागेल.