सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 35 हजार पदांवर मेगाभरती!

भारतीय पोस्ट विभागात मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत GDS पदांवर बंपर भरती केली जाणार आहे. यासाठी पोस्ट विभागाकडून निवेदन जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी 15 जुलैपासून या पदासाठी अर्ज करता येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इंडिया पोस्ट जीडीएस भर्तीची एक अधिकृत अदिसूचना प्रसिद्ध झाली आहे. यात भरतीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या तारखा नमूद करण्यात आल्या आहेत.

पात्रता आणि निवड प्रक्रिया

ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 40 वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. या भरती अंतर्गत कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय मेरिट बेस आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत वेबसाइटवरच प्रसिद्ध केली जाईल.

असा करा अर्ज

सर्वप्रथम इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जा.
यानंतर होमपेजवर भरतीशी संबंधित India Post GDS Recruitment 2024 Registration लिंकवर क्लिक करा.
आता तुम्हाला विचारलेली सर्व आवश्यक तपशील भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
अर्ज भरल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य आकारात अपलोड करा.
अर्ज फी जमा करा आणि अर्जाची एक प्रिंट काढून घ्या आणि भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवा.