बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ सीरिजमुळे चर्चेत आहे. ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ ही वेब सीरिज अखेर 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. सीरिजची कथा लाहोर याठिकाणी असलेल्या हीरामंडी आणि तेथील सुंदर महिलांच्या आयुष्याभोवती फिरताना दिसत आहे. सिनेमात सोनाक्षी हिने खलनायकाची भूमिका पार पाडली आहे. सीरिजमध्ये ‘फरीदान’ भूमिकेला सोनाक्षी हिने न्याय दिला आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या सीरिजमधील भूमिकेची चर्चा रंगली आहे.दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी हिने राजकारणाबद्दल मोठ वक्तव्य केलं आहे. जेव्हा तिला विचारण्यात आले की, अभिनेत्री वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश करणार का? तेव्हा अभिनेत्रीने मजेदार उत्तर दिले. तिथेही लोक त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करतील असं सोनाक्षी म्हणाली.
सोनाक्षी म्हणाली, ‘नाही… मी राजकारणार प्रवेश करणार नाही. नाहीतर तुम्ही परत नेपोटिज्म-नेपोटिज्म सुरु कराल… पण खरं सांगतेय मला नाही वाटत मी कधी राजकारणात प्रवेश करेल. मी माझ्या वडिलांना पाहिलं आहे. मला वाटत नाही की माझ्यात यासाठी प्रतिभा आहे. माझ्या वडिलांना लोकांमध्ये राहायला आवडतं. जे मला आवडत नाही.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘राजकारणासाठी मला सतत लोकांमध्ये राहावं लागे… सतत त्यांच्यासाठी हजर राहावं लागेल… मी माझ्या वडिलांना असं करताना पाहिलं आहे. माझ्या ही गोष्ट नाही असा विचार करु नका…’ सध्या सर्वत्र सोनाक्षी हिची चर्चा रंगली आहे.सोनाक्षी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘दबंग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर सोनाक्षी हिने मागे वळून पाहिलं नाही… सोनाक्षी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या अभिनेत्री ‘हिरामंडी’ सीरिजमुळे चर्चेत आहे.