सोलापूर जिल्ह्यात भीषण पाणटंचाई! पाण्यासाठी वणवण

एकाबाजूला उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले आहे. दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक वाढत चालली आहे. अशातच सोलापूरातील जवळजवळ शंभरहून अधिक गावांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय.सध्याच्या कडाक्याच्या उन्हामुळे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार जात असल्याचे सोलापूरात दिसून येत आहे. जिल्ह्यातील करमाळा, सांगोला आणि माळशिरस तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टँकर सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्यातील उजनी धरणातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.