शिरगावचा पूल लवकरच खुला! ३३ कोटींचा खर्च

वाळवा ते शिरगाव कृष्णा नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्व मच्छे पूर्ण झाले आहेत. दोन्ही बाजूला भराव टाकून इतर कामे पूर्ण झाली की पूल वाहतुकीस मोकळा होणार आहे. या पुलासाठी ३३ कोटी रुपये खर्च आला आहे. महापुरात शिरगावला बेटाचे स्वरूप येते, चारी बाजूंनी पाणी असल्याने शिरगाव येथील नागरिकांना महापुरात बाहेर पडता येत नाही. फक्त सिद्धेश्वर मंदिर तेवढे रिक्त असल्याने तिथे संपूर्ण गाव थांबते.

वाळवा ते शिरगाव दरम्यानमध्ये फक्त नदी आहे. परंतु पूल नसल्याने सहा ते सात मैल अंतरावर असलेल्या नागठाणे बंधाऱ्यावरून वाळवा येथे यावे लागते. या पुलामुळे कोल्हापूर, मलकापूर, कराड, कडेगांव, पलूस, ताकारी, कुंडल, कि. वाडी, विटा, तासगांव, पंढरपूर, सोलापूर, रत्नागिरी, येथील वाहतूक वाळवा ते शिरगाव कृष्णा नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पावसाळ्यात वाहतुकीस पूल खुला होणार पुलामुळे नदीत मध्यभागी असलेल्या खडकोबा मंदिर येथे पर्यटक यावेत, अशी सोय केली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला गॅलरी आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होणार आहे. पावसाळ्यात हा पूल वाहतुकीस खुला होत आहे.