‘या’ योजनांत करा गुंतवणूक! महिला होतील…….

महिलांनी आर्थिक दृष्टीने सक्षम सतर्क असणे फार गरजेचे आहे. भविष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आणीबाणीच्या काळात पैसे जवळ असणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर महिला कोणकोणत्या योजनांत गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करू शकतात हे जाणून घेऊया….

महिला पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये (पीपीएफ) खाते खोलून त्यात गुंतवणूक करू शकतात. या योजनेत एकूण 15 वर्षांच्या मुदतीवर गुंतवणूक करता येते. या योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. सध्या सरकार या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 7.1 टक्के व्याज देत आहे.

नॅशनल पेन्शन स्कीमध्येही महिला पैशांची गुंतवणूक करू शकतात. या योजनेत पैसे गुंतवल्यास महिलांचे भविष्य एका प्रकारे सुरक्षित होते. आयुष्याच्या उत्तरार्धात महिलांना आर्थिक अडचणी येणार नाहीत. ही योजना पेन्शन फंड रेग्यूलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) या संस्थेकडून चालवली जाते.

म्यूच्यूअल फंड हादेखील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. भविष्यकालीन आर्थिक गरजा लक्षात घेऊन महिला म्यूच्यूअल फंडमधील इक्विटी, डेब्ट किंवा हायब्रिड फंडमध्ये गुंतवू शकतात.

भविष्यात स्वत:ला तसेच कुटुंबीयांना आर्थिक अडचण येऊ नये यासाठी महिला स्वत:चा एक जीवन विमा काढू शकता. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून महिलांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे जीवन विमा चालू करण्यात आलेले आहेत. भविष्यात वैद्यकीय उपचाराची गरज पडल्यास आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून महिला स्वत:चा एक आरोग्य विमा काढू शकतात. असे केल्यास मोठ्या आजाराच्या उपचारासाठी पैसे देण्याची गरज भासणार नाही.

वेगवेगळ्या बँकात फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडीच्या योजनेतही महिला पैसे गुंतवू शकतात. एफडीच्या मदतीनेही महिलांना गुंतवलेल्या पैशांवर चांगला परतावा मिळू शकतो.