‘ही’ सरकारी कंपनी होणार शेअर बाजारात लिस्ट…

नवरत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येत्या एक-दोन वर्षात आयपीओ आणणार आहे. देशातील रिन्यूएबल एनर्जी क्षमता वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. ५०० गिगावॅटच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम केलं जात असून, कंपनी पुढील एक-दोन वर्षात शेअर बाजारात लिस्ट होऊ इच्छित आहे अशी प्रतिक्रिया एसइसीआय चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आरपी गुप्ता यांनी दिली. रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पासाठी निविदा काढण्यासाठी न्यू अँड एरनेबल एनर्जी मंत्रालयाची नोडल एजन्सी असल्याने एसइसीआय ची स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग देखील महत्त्वपूर्ण आहे.

NTPC green energy देखील आयपीओ आणणार

नुकताच महारत्न सीपीएसइ एनटीपीसी ग्रीन एनर्जी द्वारे दहा हजार कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट सादर केला आहे. ही कंपनी एनटीपीसीची रिन्यूएबल एनर्जी युनिट आहे. आयपीओ मध्ये फक्त नवीन शेअर्स जारी केले जातील या इश्यूमध्ये मिळणाऱ्या रकमेपैकी ७५00 कोटी रुपये एनटीपीसी ग्रीन एनर्जीची उपकंपनी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचे थकीत कर्ज अंशतः किंवा पूर्णपणे फेडण्यासाठी वापरले जातील.