फोल्डेबल फोनची क्रेझ तरूणाईमध्ये मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. या फोल्डेबल फोनची आवड असणाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. अनेक मोबाईल कंपन्यांनी त्यांचे फोल्डेबल फोन मार्केटमध्ये आणले आहेत. आज मोबाईलच्या दुनियेतील आणखी एका मोठ्या कंपनीने त्यांचा फोल्डेबल फोन लॉंच केला आहे. या कंपनीचे नाव आहे ओप्पो.
ओप्पो कंपनीच्या या फोल्डेबल फोनचे नाव Oppo Find N3 Flip असे आहे. या फोनचा मुख्य डिस्प्ले हा 7.82 इंच असून याची बाहेरील स्क्रिन ही 6.3 अशी असणार आहे.
विशेष म्हणजे हा फोन Android 13 OS वर चालतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 ही चिपसेट देण्यात आली आहे. या फोल्डेबल फोनची किंमत तब्बल १,१३,८०० इतकी आहे.
ओप्पोच्या या फोल्डेबल फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चा नवा प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 16GB रॅम आणि 512 GB स्टोरेजसह जोडण्यात आलेला आहे. या फोनची मुख्य स्क्रिन 7.82 इंचाची असून ती 2K रिझोल्यूशनची आहे.
या फोनच्या स्क्रिनच्या संरक्षणासाठी अल्ट्रा लेअरची थीन ग्लास देण्यात आली आहे. फोल्डेबल फोनच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास या फोनचा डिस्प्ले 6.31 इंच असून तो FHD+ आहे. याच्या रिझोल्यूशनबद्दल बोलायचे झाल्यास ते 1116×2484 पिक्सेल्स इतके आहे.
Oppo Find N3 Flip चा कॅमेरा कसा ?
या फोल्डेबल फोनच्या कॅमऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यातला कॅमेरा तगडा आहे. या फोल्डेबल फोनचा कॅमेरा ४८ मेगापिक्सेल्सचा असून यातील अल्ट्रावाईड अँगल लेन्स देखील ४८ मेगापिक्सेल्स असणार आहे.
विशेष म्हणजे या फोल्डेबल फोनमध्ये तब्बल 64 मेगापिक्सेल्सचा टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या मोबाईलमध्ये 32 मेगापिक्सेल्सचा सेल्फी शूटर कॅमेरा देण्यात आला आहे.
Oppo Find N3 Flip मोबाईलवरील डिस्काऊंट
ओप्पोचा हा फोल्डेबल फोन उद्यापासून (22 ऑक्टोबरपासून) खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या फोनवर तुम्हाला 8000 रूपयांचा डिस्काऊंट मिळणार असून ६ महिन्यांची स्क्रिन वॉरंटी देखील मिळणार आहे.
या फोल्डेबल फोनवर तुम्हाला १२००० रूपयांचा कॅशबॅक आणि SBI बॅंक आणि ICICI बॅंक कार्डवर २४ महिन्यांचा नो कॉस्ट EMI देखील मिळणार आहे. हा फोन तुम्हाला फिल्पकार्ट आणि ओप्पोच्या वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी करता येईल. तसेच, प्रमुख रिटेलर्सकडे हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.