BSNL ने आपली नवीन 4G सेवा लाँच केली आहे. कंपनीने आपले नेटवर्क अपग्रेड केले जात आहे. कंपनीने आपले नेटवर्क अजून सुपरफास्ट करण्यासाठी संपूर्ण देशात 4G नेटवर्क सेवा लाँच केली आहे. कंपनी लवकरच 5G सेवादेखील लाँच करणार आहे.यासाठी त्यांनी नेटवर्क टेस्टिंग सुरु केले. त्यामुळे आता बीएसएनएल कंपनी 5G सिम ग्राहकांना देणार आहे.
BSNL ने १५ हजारांपेक्षाही जास्त साइटसवर 4G नेटवर्क सेवा सुरु केली आहे.कंपनीच्या या साइट्स आत्म निर्भर भारत उपक्रमाअंतर्ग येतात. यामुळे देशातील 4G नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करतील. BSNL ची 4G सेवा ही पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाव अवलंबून आहे. मोबाईल टॉवर्समध्ये 4G सेवा इनस्टॉल करण्यात आली आहे.ऑक्टोबर अखेरपर्यंत ८०,००० हजारांहन अधिक 4G नेटवर्क टॉवर्स इन्स्टॉल करण्यात येतील. त्यानंतर पुढील वर्षी मार्च महिन्यात २१,००० टॉवर्स बसवण्यात येतील.
म्हणजेच जवळपास १ लाख 4G नेटवर्क टॉवर्स मार्च २०२५ पर्यंत इन्स्टॉल करण्यात येणार आहे. त्यामुळे युजर्संना मोठा फायदा होणार आहे.