सरकारी वेबसाईट वापरणाऱ्या युझर्संनी ते पॉर्न साईटवर आपोआप जात असल्याचा गंभीर आरोप

सरकारी वेबसाईट वापरणाऱ्या युझर्संनी ते पॉर्न साईटवर आपोआप जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे सायबर सुरक्षेसंबंधी प्रश्न निर्माण झाला. अनेकांनी अशी तक्रार केली होती. त्यानंतर प्राथमिक तपासात असं आढळलंय की, सरकारी कार्यालयांच्या सिस्टिममध्ये मालवेअर डाऊनलोड झाला असल्याने असं होत आहे.

न्यूज१८ ने दिलेल्या बातमीनुसार, सायबर सुरक्षेसंबंधी तज्ज्ञ याप्रकरणाचा तपास करत आहेत. सरकारी वेबसाईटवर लॉगिन करत असताना ते पॉर्न साईटवर रिडायरेक्ट होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. तज्ज्ञांच्या मतानुसार, सरकारी कार्यालयातून नकळत काही वेबसाईटवर लॉगिन केले असल्याने मालवेअर सिस्टिममध्ये शिरला आहे.

मागील महिन्यात केंद्रीय मंत्रालयाच्या वेबसाईटवर गेल्यास पॉर्न साईटवर रिडायरेक्ट होत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या प्रकणाची गंभीर दखल घेऊन तपास सुरु करण्यात आला. काही घातक मालवेअर सिस्टिममध्ये डाऊनलोड झाले असल्याने असा प्रकार घडत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Indian Computer Emergency Response Team (CERT-In)कडून हे प्रकरण हाताळलं जातं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इंटरनेट वापरत असताना योग्य प्रक्रियेचा वापर न केल्याने असा प्रकार घडला आहे. काही वेबसाईट सरकारी कार्यालयात बॅन करण्यात आल्या आहेत.तरी १०० टक्के बंदी आणणं अवघड आहे.

CERT-In टीमने सांगितलं की, हॅकर्सनी Distributed Denial of Service (DDoS) चा वापर केला आहे. या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून नागरिकांना सरकारी सेवांचा लाभ घेण्यास अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलंय.