निवडणुकीच्या धामधुमीत ईडीची मोठी छापेमारी!

अंमलबजावणी संचालनालयांन रांची, झारखंडमधील अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त (Massive केली आहे. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीनं मोठी रोकड जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रोकड 20 ते 30 कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. छापेमारीत जप्त करण्यात आलेली रोकड एवढी मोठी आहे की, ईडी अधिकाऱ्यांनी आता नोटा मोजण्याच्या मशीन मागवल्या आहेत. 

झारखंडमध्ये ईडीच्या वतीनं मोठी छापेमारी करण्यात आली आहे. ईडीच्या छापेमारीत मोठी रोकड जप्त करण्यात आली. झारखंडचे ग्रामविकासमंत्री आलमगीर आलम यांचे स्विय सहायक संजीव लाल यांच्या सहायकाकडून रोकड जप्त केल्याची ईडीची माहिती मिळत आहे. याप्रकरणी ईडीनं अटकेची कारवाई करत झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना ताब्यात घेतलं आहे. झारखंडमधील ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांच्या अंमबजावणीत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. याचदरम्यान ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.