ठाकरे बंधू आले एकत्र….

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या रायगड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत. आज पोलादपूरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली या सभेतून त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर ईडी कारवाईवरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील ईडीच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. भविष्यात भाजपला देखील ईडीसारख्या कारवाया जड जातील, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.