महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये येत्या 24 तासात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. रविवारपासून मध्य महाराष्ट्र, घाट आणि दक्षिण कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे.भारतीय हवामान विभागाच्या (IMD) जिल्हानिहाय अंदाजानुसार, या आठवड्याच्या शेवटी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडेल.
दरम्यान, 10 मे पासून धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर आणि मुंबईच्या आसपासच्या इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने, पुढील 24 तासात धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, या भागात तुरळक पावसाची शक्यता आहे.
याशिवाय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.आयएमडीच्या अंदाजानुसार, 11 मे रोजी अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे,
सातारा,छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.