वाळवा तालुक्यात गाव गटारमुक्त योजना

जुनेखेड हे वाळवा तालुक्यातील अवघे ४ हजार २०० लोकवस्ती असणाऱ्या गावात मात्र संघटित तरुणांची वैचारिक फळी तयार झाली आहे. विकास हे ध्येय ठेवून ध्येयवेड्या तरुणांनी याच गावात दोन वर्षांत विकासाचा डोंगर व गावचा कायापालट केला आहे. प्रथम शिक्षण, आरोग्य व पारदर्शकता याला महत्त्व दिले. प्रथम गावाची जिल्हा परिषद शाळा गावकरी, तरुणांनी श्रमदानातून डागडुजी व स्वच्छ रंगरंगोटी करून शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. शाळा संगणीकृत गुणवत्ता यादीत आणली. यासाठी गावकऱ्यांनी श्रमदानाबरोबर आर्थिक लागेल ती मदत केली. एक तास गावासाठी ही संकल्पना राबवली.

जुनेखेड येथे ग्रामस्थांनी कोणत्याही शासकीय निधी अथवा मदतीशिवाय जुनेखेड गावच्या विद्यमान सरपंच व गावकरी तसेच सहकार्यांच्या मदतीने गावअंतर्गत गटार मुक्त केले आहे. अनेक विविध योजना राबवून या गावाने विकासाची गंगा गावात वाहती केली आहे…