इंटरनेटचा स्पीड आणखी वाढणार! 6G साठी मोठं पाऊल…..

आजकाल प्रत्येक गोष्ट ही इंटरनेटवर अवलंबून आहे. भारतातील लोकांनी 5G इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली आहे. 5G हे एक हाय स्पीड नेटवर्क आहे. जे अतिशय जलद इंटरनेट अॅक्सेस देते.

5G नंतर आता भारत सरकार 6G कनेक्टिव्हीटीवर काम करत आहे.यासाठी इंडिया 6G अलायन्सची स्थापना करण्यात आली आहे. सरकार लवकरच युरोपच्या इंडस्ट्री अलायन्स 6G सह सामंजस्य करारावर सही करणार आहे. सध्या या कराराचा मसुदा तयार करण्यात आला आहे.EU इंडिया ट्रेड आणि टेक्नॉलॉजी काउंसिल अंतर्गत अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीवर आपले सहकार्य वाढवत आहे.

या नवीन करारामुळे 6G टेक्नॉलॉजी क्षेत्रात सहकार्य वाढेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान लवकरच 6G आणि इंडस्ट्री अलायन्स 6G यांच्यात करार केला जाईल. हा करार दूरसंचार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा आहे.