अक्षय्य तृतीयेनिमित्त सोन्याच्या किंमतीत वाढ…

अक्षय्य तृतीयेनिमित्त आज सकाळपासूनच सोनाराच्या दुकानात गर्दी उफाळली आहे. नागरिक सोने आणि चांदी खरेदीसाठी घराबाहेर पडले आहेत. गेल्या महिन्यात सोन्याच्या दरांत कमालीची वाढ झाली होती.त्यानंतर हळूहळू दर कमी होताना दिसले. अशात आज अक्षय्य तृतीयेनिमित्त सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

त्यामुळे तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचा विचार केला असेल, तर आजचा भाव काय आहे ते जाणून घ्या. आज सोनं ८५० रुपयांनी महागलं आहे. तर चांदीची किंमत १,३०० रुपये प्रति किलोने वाढली आहे.आज चांदीच्या दरांमध्ये प्रति किलो १,३०० रुपयांची वाढ दिसतेय.

काल ८५,२०० रुपये प्रति किलो असलेली चांदी आज ८६,५०० रुपये प्रति किलो भावाने विकली जात आहे.अक्षय्य तृतीयेनिमित्त सोन्याचे दर (Gold Price) देखील वाढले आहेत. आज २२ कॅरेट सोनं ८५० रुपयांनी महागून ६७,१५० रुपये प्रति तोळा भावाने विकलं जात आहे.

तर २४ कॅरेट सोनं ९३० रुपयांनी महागलं असून प्रति तोळा ७३,२४० रुपये किलोने विकलं जात आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव ६९० रुपयांनी महागला आहे. त्यामुळे सोनं ५४,९४० रुपये प्रति तोळा आहे.