थेट गुगल मॅपवरून बुक करता येईल मेट्रो तिकीट

गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ह्यात एक घोषणा गुगल मॅपबद्दल करण्यात आली आहे, त्यानुसार थेट गुगल मॅपवरून मेट्रो तिकीट बुक करता येईल. ह्यासाठी इतर अ‍ॅपवर जाण्याची गरज नाही. गुगल अ‍ॅपवर रूट आणि लोकेशन शोधण्यासह मेट्रो तिकीट ऑनलाइन बुक करता येईल. त्यामुळे युजर्सचा वेळ वाचेलचा परंतु त्याचबरोबर अनेक अ‍ॅप डाउनलोड करून स्टोरेज वाया जाणार नाही. यासाठी गुगल मॅपनं देशातील ओपन डिजिटल ई-कॉमर्स नेटवर्क (ONDC) सह भागेदारी केली आहे.

प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये मिळेल गुगल मॅपवरून मेट्रो तिकीट बुकिंगची सुविधा

गुगल क्लाउड इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर विक्रम बेदी यांनी दावा केला आहे की गुगल मॅपवरून मेट्रो तिकीट बुक करण्याची सुविधा पुढील काही महिन्यांमध्ये सर्व मेट्रो सिटीमध्ये सुरु होईल, जी बायर अ‍ॅपसह ओपन नेटवर्कशी इंटीग्रेटेड असेल. यावर्षी च्या सुरुवातीला गुगलनं ओएनडीसीसह भागेदारी करून सेलरसाठी एक प्रोग्राम लाँच केला होता.

व्हॉट्सअ‍ॅप देत आहे मेट्रो तिकीट बुकिंग सुविधा

विशेष म्हणजे याआधी व्हॉट्सअ‍ॅपनं मेट्रो तिकीट बुकिंगची सुविधा सुरु केली होती. ह्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपवरून मेट्रो तिकीट बुकिंगची सुरुवात बंगळुरू आणि दिल्लीपासून सुरु झाली आहे. मेटाच्या मालकीच्या अ‍ॅप मेट्रोमध्ये तिकीट बुकिंग सोबतच इन-अ‍ॅप पेमेंटचा सपोर्ट देखली आहे. परंतु गुगलच्या स्वतःचा पेमेंट गेटवे प्लॅटफॉर्म गुगल पे आहे ज्याचा वापर पेमेंटसाठी केला जाऊ शकतो.

गुगलचे फोनही बनतील भारतात

अ‍ॅपल नंतर गुगलनं देखील आपले स्मार्टफोन भारतात बनवण्याच्या निर्णय घेतला आहे. कंपनीच्या गुगल पिक्सल ८ सीरीजचे मॉडेल भारतात मॅन्युफॅक्चर केले जातील. ह्यासाठी गुगलनं स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी भागेदारी केली आहे. ही घोषणा आयटी मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये करण्यात आली आहे.