करमाळ्यातील पक्षांतराचा फायदा कोणाला?

माढा लोकसभा निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदार संघाने सर्वांचेच विशेष लक्ष वेधून घेतले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

शिवसेनेसोबत असलेल्या साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर या पक्षांतराचा निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून इच्छुकांकडून विधानसभेची तयारी झाल्याचे दिसून आले. करमाळा तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळण्याची दाट शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकरही आघाडी घेतील, असाही दावा करण्यात येत आहे.