पुढील वर्षी २०२४ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत संपणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक कार्यक्रम प्रस्तावित आहे.सध्या या गावात प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. ४ डिसेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे.
तेरा ग्रामपंचायत मधील गावकऱ्यांनी हरकती नोंदवल्या आहेत.१६ ऑक्टोबर रोजी संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे प्रभाग पाडून पन्नास ग्रामपंचायतीच्या सीमा निश्चित केल्या आहेत.सीमा निश्चित केलेल्या प्रभागांचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर करण्यात आला.सोमवारी, २० ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला गेला. आयोगाच्या सूचनेनुसार त्यात दुरुस्ती करण्यात आल्या. त्यानंतर, ४ डिसेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली.यास १३ गावातून हरकती आल्या.
हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर २ जानेवारी २०२४ रोजी सदर प्रारूप प्रभाग रचनेच्या अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.९ जानेवारी रोजी अंतिम प्रभाग रचना विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.तेरा हरकती दाखलमाढा तालुक्यातील वेणेगाव, मंगळवेढा तालुक्यातील येळगी, बार्शीच्या दहिटणे मधून २ हरकती तसेच लाडोळे येथून १ हरकत घेण्यात आली आहे.
सांगोला तालुक्यातून बागलवाडी तसेच माळशिरस मधून हनुमानवाडी व भांबुर्डी गावातून हरकत दाखल झाली आहे.अक्कलकोट तालुक्यातील सोळसे तांडा या गावातून तीन हरकती आल्या आहेत. मोहोळमधून वडदेगाव तसेच गोटेवाडी येथून हरकती आल्या आहेत.
२०२४ येथे मध्ये येथे होतील निवडणुका
■ बार्शी : सुर्डी, लाडोळे, रुई, ताडसोंदणे, दहिटणे. ■ दक्षिणसोलापूर : कुडल, आलेगाव. ■ अक्कलकोट : सातनदुधनी, संगोगी ब., समर्थनगर, कल्लप्पावाडी, गांधीनगर सोळसे लमाण तांडा.■ माढा : वेणेगाव, उजनी टें. ■ करमाळा : वरकुटे, भाळवणी, लव्हे. ■ पंढरपूर : बिटरगाव, जळोली, जाधववाडी, पांढरेवाडी, गाडी, लोणारवाडी.■ मोहोळ : कोन्हेरी, लमाणतांडा, वड्डेगाव, गोटेवाडी. ■ खुडूस, हनुमानवाडी, जाधववाडी, झंजेवाडी, सुळेवाडी, डोंबाळवाडी, पिलीव, भांबुर्डी, डोंबाळवाडी कु., झिंजेवस्ती.