सोलापुरात ठाकरे गटाचं मोठं नुकसान!

सद्या प्रत्येक मतदार संघातून निवडणुकीची तैयारी जोरात सुरू आहे. सोलापुर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडी नगर परिषदेतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यामध्ये सोलापुरमधील नगरसेवक अरविंद पवार, युसुफ दाढवाले, लतीफ मुलाणी, संभाजी सातव, संजय माळी, संजय खोत, संजय साठे, सतीश इंगळे, रोहित सोलणकर, सुमित तांबट, प्रतीक गावडे, तुषार वाघ, प्रतीक पाटील तर साक्री येथील नगरसेवक नगरसेवक पंकज मराठे, मुकेश शिंदे, राजधर देसले, अजय सूर्यवंशी, सोनू मारनर, प्रमोद अहिरराव, पंकज गवळी अजय जाधव, साहेबराव बोरकर , जितेंद्र खैरणार, समाधान याईस, व्यंकट नेरे, निखिल अहिरराव यांचा समावेश आहे.