मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने राज्यातील मराठा व मागास कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण करणारे प्रगणक व पर्यवेक्षक यांना गेले सहा महिने मानधन मिळाले नव्हते. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगणक व पर्यवेक्षक यांचे मानधन देण्यासाठी ४ कोटी ३ लाखांचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे. जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसील कार्यालयांकडे मानधनाचा धनादेश पाठविला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात सर्वेक्षण केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार आहे.