आटपाडीचे ओढे नगरपंचायतीच्या ताब्यात देण्याची मागणी!

आटपाडीच्या दोन्ही ओढ्यात प्रचंड प्रमाणात केली गेलेली अतिक्रमणे काढून सदरचे दोन्ही ओढे नगरपंचायतच्या ताब्यात द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी ओबीसीतील अल्पसंख्याक विभागाचे पुणे विभागीय अध्यक्ष सादिक खाटिक यांनी पत्रकार परिषदेत केली. एस.टी. डेपो एस. टी. स्टॅन्ड परिसरातच साकारला जावा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, खादी भांडाराच्या जागेत शनिवारचा आठवडा बाजार भरवावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे सादिक खाटिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे म्हणाले.

आटपाडीचे दोन्ही ओढे नगरपंचायतीच्या ताब्यात देऊन अंबामाता मंदिराच्या पुढील ओढापात्रात नगरपंचायतीची इमारत उभारावी. खादी भांडार व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आठवडा भाजीपाला बाजार भरावा यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.