आरक्षणासाठी पेठून उठा, मराठा समाज पाठीशी; मनोज जरांगे

चौंडी येथे धनगरांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे उपस्थित होते.  मनोज जरांगे यांनी मेळाव्यात संबोधित केले. तसेच धनगर समाजाला आरक्षणासाठी पेठून उठण्याचे आव्हान केले. उठाव केल्याशिवाय पर्याय नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. 

मनोज जरांगे म्हणाले, मनावर घ्या म्हणजे आरक्षण मिळेल. आपल्या दोघांचं दुखणं एकच आहे. राज्यातील शेवटच्या टोकावरील धनगराला तुम्हाला आरक्षण सांगावं लागेल. धनगराची लाट उसळली तर या देशात कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही.  पण ती कसरत तुम्हाला करावी लागणार त्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही.

तुमचा व्यवसाय शेती आमचा व्यवसाय शेती आहे. मी विचारलं विदर्भातील मराठ्यांना आरक्षण का दिलं तर ते म्हणाले त्यांचा व्यवसाय शेती आहे मग आमचा व्यवसाय काय आहे?, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.

धनगर समाज घटनेत असून यांना आरक्षण का नाही, असा प्रश्न मला देखील पडला आहे. सामान्य धनगर बांधवांना आता काहीतरी डोकं लावावा लागणार. नाहीतर काही खरं नाही. तुम्हाला तुमच्या लेकरा-बाळांचं भल करायचं असेल तर पेटून उठावं लागेल. तुम्ही घर अन् घर जाग करा मी ताकदीने तुमच्या पाठीशी आहे. नेते म्हणाले तसं करु नका?, असे मनोज जरांगे म्हणाले.

आमच्यात देखील काही नेते उठवले होते. मात्र सामान्य मराठ्यांनी दांडके हाती घेतले म्हटल्यावर ते काही बोलत नाहीत. राजकारण डोक्यात ठेऊन काही केलं तर आरक्षण मिळणार नाही. १७ दिवस अख्ख मंत्रिमंडळ माझ्याजवळ बसून होते. मी काहीही करु शकलो असतो पण मी माझ्या जातीशी प्रमाणिक आहे. जातिशी गद्दारी करणारी औलाद माझी नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

५० दिवसात आरक्षण मिळेल, याचा पाठलाग करा. निवडणुकीची वाट बघू नका. फक्त जात म्हणून लढा राजकारण मधे आणू नका, सर्व धनगरांनी महाराष्ट्रात जावं. घरोघरी जावं हे केलं तर आरक्षण मिळायला वेळ लागणार नाही. पण सामान्य लोकांना उठाव करावा लागले, असे आव्हान मनोज जरांगे यांनी केले.