हिंगोलीमध्ये भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीदरम्यान हिंगोली विधानसभेचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना अचानक भोवळ आली आहे. तिरंगा रॅली सुरू असताना तानाजी मुटकुळे जमिनीवर कोसळले. यानंतर एकच गोंधळ उडाला. यादरम्यान कार्यकर्त्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता कार्यकर्त्यांनी आमदार मुटकुळे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या तानाजी मुटकुळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. मात्र, या घटनेने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
तानाजी मुटकुळे (Tanaji Mutkule) यांना चक्कर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन त्यांना खाली आणले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. काही कार्यकर्त्ये त्यांना वारे घालताना देखील दिसत आहेत. यावेळी पोलिस कर्मचारी देखील तानाजी मुटकुळे यांना खाली घेऊन जाण्यासाठी मदत करताना दिसतोय. खाली उभ्या असलेल्या गाडीमध्ये टाकून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिरंगा रॅली सुरू असतानाच ही घटना घडली. सध्या तानाजी मुटकुळे यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती येतंय.
पहलगामवरील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. भारतीय सैन्याच्या शूर धाडसी पराक्रमाच्या सन्मानार्थ भाजपाकडून सध्या राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे. आज हिंगोलीमध्ये या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये आमदार तानाजी मुटकुळे हे पोहोचले होते. मात्र, त्यांना अचानक चक्कर आली आणि ते थेट जमिनीवर कोसळले.
यानंतर कार्यकर्त्यांनी धाव घेत तानाजी मुककुळे यांनी लगेचच स्टेजवरून उचलून खांद्यावर घेत खाली आणले. अजिबात वेळ न घालता त्यांना उपचारासाठी हिंगोलीच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळतंय. सध्या वातावरणात सतत बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती बघायला मिळतंय. यामुळे उकाडा चांगलाच वाढला आहे.