ठाकरे-मोदी एकत्र येणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येतील का? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकत्र येणार की नाही यावर मी बोलणार नाही. पण निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींची वेळ मागितली होती”, असा मोठा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला.

त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय-काय घडत आहे? असा प्रश्न दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. “वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी हा प्रश्न उपस्थित केला. ठाकरे मोदींवर व्यक्तीगत बोलले. त्यांना माफी मिळणार की नाही ते माहिती नाही. ज्याप्रकारे भाषणं झाले ते योग्य नव्हते. मोदींचं यश वैयक्तिक आहे. मोदींची सुप्त लाट महाराष्ट्रात असल्याने आम्ही लोकसभेत 41 जागा सुद्ध मिळवू. पडद्यामागे काय घडेल ते सांगता येत नाहीत. पण इथे शिवसेनेचं नेतृत्व हे एकनाथ शिंदेच करतील”, असं दीपक केसरकर म्हणाले.