सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल दूध महागलं, लिटरमागे इतक्या रूपयांची वाढ

सर्वसामन्यांचं बजेट कोलमडवणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अमूल दूध कंपनीच्या दरात वाढ झाली आहे. महागाईने त्रस्त असलेल्या जनतेच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनने दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून म्हणजेच 3 जूनपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. अमूल दूधाच्या किमतीत एक लिटरमागे प्रत्येकी 2 रूपयांनी भाव वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना दोन रूपये अधिक मोजावे लागणार आहेत.

अमूल गोल्ड, अमूल ताज आणि अमूल शक्ती या तिन्ही कंपन्यांच्या दरामध्ये ही वाढ होणार आहे. तिन्ही कंपन्यांच्या दूधाच्या किमतीमध्ये भाववाढ झाली आहे. अमूल ताजाच्या छोट्या पिशव्यांच्या किमतीमध्ये कोणतीही अधिकचे पैसे द्यावे लागणार नाहीत. म्हणजे छोट्या पिशव्यांमधील दूध आहे त्या किमतीमध्येच मिळणार आहे.

अमूलने दूधाच्या दरातील वाढ ही फक्त एका राज्यासाठी नाहीतर संपूर्ण देशभरात केली आहे.अमूल दूध आता नवीन किमतींनुसार अमूल गोल्ड अर्धा लिटर आता 32 रुपयांवरून 33, अमूल ताजा 500 मिलीची किंमत 26 रुपयांवरून 27, मूल शक्ती 500 मिली आता 29 रुपयांवरून 30 रूपये इतकी झाली आहे. एक लिटर दुधासाठी लोकांना आता 66 रुपये द्यावे लागणार आहेत.

जे निवडणुकीआधी 64 रुपये होते. दुधाच्या या वाढलेल्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. याचाच अर्थ आता महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.