मनोज जरांगेंनी बोलावली 24 ऑक्टोबरला इच्छुकांची बैठक

प्रत्येकालाच वाटतं मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे. तुम्ही सगळेजण जरी म्हणालेत मलाच पाहिजे तरी मी रुसणार नाही रागावणार नाही. पण एक उमेदवार देण्याचा प्रयत्न असेल असं मत  मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी व्यक्त केले. मी राजकीय नेतृत्व करणार नाही, मी पक्षासारखं मतही लादणार नाही. सगळ्यांचे योगदान आहे. माझ्यासाठी सगळे सारखे असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

एका मतदारसंघातून चार-पाच जण अर्ज भरा. कुणीही बाँड लिहून देऊ नका आधी आम्हाला विचारा. ज्याने आपली जिरवली त्याची आपल्याला जिरवायची हे सुद्धा डोक्यात ठेवायचं असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाच योगदान इच्छुक उमेदवारांनी डोळ्यासमोर ठेवावं असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 20 ऑक्टोबरला इच्छुकांची आपण बैठक घेतली होती ती लढायचं की पाडायच यासाठी होती. आता 24 ऑक्टोबरला पुन्हा एकदा आपण इच्छुकांची बैठक घेत आहोत.

आपण त्यांना सांगितलं होतं की मतदार संघात बैठक घ्या आणि एक उमेदवार ठरवा. पण त्यांच्या त्यांच्यात मेळ जमायचा काही अंदाज दिसत नाही असे जरांगे म्हणाले. मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही मी सामाजिक नेतृत्व करणार असल्याचे मनो जरांग म्हणाले. 24 ऑक्टोबरला सगळ्या इच्छुकांनी अंतरवाली सराटीत यायचं असेही जरांगे म्हणाले.