OTT Release This Weekend:  ड्रामा, सस्पेन्स थ्रिलर ते अॅक्शनपटाची मेजवानी, ओटीटीवर या वीकेंडला

हा वीकेंड प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, सीरिज रिलीज झाले आहेत. यापैकी काही वेब सीरिज, चित्रपट आधीच OTT वर रिलीज झाले आहेत. रोमान्स, अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा अशा वेगवेगळ्या  धाटणीच्या प्रेक्षकांना चित्रपट, वेब सीरिज पाहता येणार आहेत. 

गुल्लक 4

सुपरहिट वेब सीरिज गुल्लकचा चौथा सीझन रिलीज होणार आहे. मिश्राजींचा धाकटा मुलगा अमन याच्या भोवती वेब सीरिजचे कथानक असणार आहे. अमन आता वयात येत असून पौगंडावस्थेत त्याच्यात होणारे बदल दिसणार आहेत.तर,  मिश्राजींचा मोठा मुलगा आता घराचा भार स्वत: च्या खांद्यावर घेणार आहे. गुल्लकच्या आधीच्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  ‘गुल्लक’ वेब सीरिज ही सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 7 जून रोजी रिलीज होणार आहे. 

‘बडे मियाँ छोटे मियाँ’

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची मुख्य असलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’हा अॅक्शनपट  आता ओटीटीवर रिलीज होत आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता.  त्यानंतर ओटीटीवर रिलीज होत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सरासरी कमाई केली होती. हा चित्रपट 6 जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज झाला आहे. 

 ब्लॅक आउट 

अभिनेता विक्रम मेस्सी याचा ‘ब्लॅक आउट’  हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. विक्रांत मेस्सी सोबत मौनी रॉय, सुनील ग्रोव्हरची या चित्रपटात भूमिका आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. एका रात्री घडत असलेल्या घटनाक्रमांवर हा चित्रपट आहे. पत्रकार असलेला विक्रांत मेस्सी हा  एका रात्री वीज गेल्याने पत्नीसाठी जेवण आणायला बाहेर जातो. त्यावेळी एकामागोमाग एक घटना घडत जात आहे. ‘ब्लॅक आउट’  हा चित्रपट जिओ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

हिट मॅन

हिट मॅन ही एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. ग्लेन पॉवेल हा न्यू ऑरलियन्स कॉलेजमधील प्राध्यापक गॅरी जॉन्सनच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 7 जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार  आहे.