लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी गावभेट दौय्रात मराठा आरक्षण प्रश्नावरून आ. प्रणिती शिंदे यांना सभा घेण्यास मज्जाव करणाऱ्या पाठखळ गावातून 307 मताचे मताधिक्य मिळाले. मंगळवेढा तालुक्यात 11 गावे वगळता सर्वच गावातून प्रणिती शिंदे या आघाडीवर राहिल्या.लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रणिती शिंदे यांनी संभाव्य काँग्रेसच्या उमेदवार म्हणून गाव भेट दौऱ्याचे आयोजन केले.
त्यामध्ये पहिल्याच दौऱ्यात पहिल्याच गावात पाटकळ येथे त्यांना मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट नसल्यामुळे आम्ही नेत्याला गावबंदी केली असल्याचे सांगत त्यांना सभा घेण्यास मज्जाव केला त्यानंतर त्यांनी सभा न घेता ग्रामस्थ संवाद करून पुढच्या दौऱ्याला मार्गस्थ झाल्या एकूणच त्यांच्या मंगळवेढा दौऱ्यात फक्त पाटकळ येथे त्यांना विरोधात सामोरे जावे लागले मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाटखळ गावाने प्रणित शिंदे यांना 307 मताचे मताधिक्य मिळत चार बुथवर 1178 इतकी मते तर भाजपचे राम सातपुते यांना 871 इतकी मते मिळाली.