Fraud Calls : अलर्ट! या नंबरवरुन येणारे कॉल आहेत धोक्याचे; क्षणात होऊ शकतो मोबईल हॅक अन् अकाउंट रिकामं

ट्रायने बनावट कॉल आणि मेसेज रोखण्यासाठी ऑक्टोबर 2024 पासून नवे नियम लागू केले असले, तरीही स्कॅमर नवीन मार्गांनी लोकांना फसवत आहेत.इंटरनेटवरून होणाऱ्या VoIP कॉलद्वारे (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) लोकांना फसवले जात आहे. हे कॉल इंटरनेटवरून केले जात असल्याने त्यांचा मागोवा घेणे अवघड होते.ऑक्टोबर 1, 2024 पासून ट्रायने नवा नियम लागू केला आहे, ज्यामुळे बनावट कॉल आणि मेसेज नेटवर्क स्तरावरच अडवले जातील.

टेलिकॉम कंपन्या आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून अशा फसव्या कॉल्सना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही स्कॅमर सतत नवनवे तंत्र वापरून लोकांना फसवत आहेत. आता ते इंटरनेट कॉलचा वापर करून फसवणूक करत आहेत.थायलंडच्या टेलिकॉम अधिकाऱ्यांच्या मते, +697 किंवा +698 पासून सुरू होणारे आंतरराष्ट्रीय नंबर हे इंटरनेट कॉल असतात. या नंबरमधून येणारे कॉल्स शोधणे कठीण असते, म्हणून स्कॅमर त्यांचा वापर करून फसवणूक करतात. हे कॉल्स VPN (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) चा वापर करून केल्यामुळे कॉल करणाऱ्याचे ठिकाण शोधणे कठीण होते.