आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांची भूमिका असलेल्या मुंज्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी सुरू आहे. कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना ‘मुंज्या’ने दमदार कथानक, कलाकारांचा अभिनय यावर प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. मागील आठवड्यात रिलीज झालेला ‘मुंज्या’ आता दुसऱ्या आठवड्यात कशी कमाई करेल याकडे सिनेवर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘मुंज्या’ चित्रपटाने सहा दिवसात आपला बजेट वसूल केले. हॉरर कॉमेडीपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला असून बॉलिवूडमध्ये याचीच चर्चा आहे. चित्रपटाची सुरुवात चांगली झालीच शिवाय ”मुंज्या”ने ओपनिंग वीकेंडला चांगली कमाई केली. यानंतर, चित्रपटाने वीकडेज मध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची कमाई केली. चित्रपट रिलीज झाल्याच्या सहा दिवसांच्या आधीच चित्रपटाचा निर्मिती खर्च वसूल केला आहे.
”मुंज्या”ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 4 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 8 कोटी, चौथ्या दिवशी 4 कोटी, 4.15 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी कोटी आणि सहाव्या दिवशी 4 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता चित्रपटाच्या रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या कमाईचे आकडेही आले आहेत.
सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, ‘मुंज्या’ने रिलीजच्या सातव्या दिवशी 3.75 कोटींची कमाई केली. अशा प्रकारे ‘मुंज्या’ने बॉक्स ऑफिसवर आठवडाभरात आता एकूण 35.15 ची कमाई केली आहे.
यंदाच्या वर्षातील तिसरा हिट चित्रपट
मॅडॉक्स फिल्मची सुपरनॅच्युरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट ”मुंज्या” हा ‘शैतान’ आणि ‘आर्टिकल 370’ नंतर वर्षातील तिसरा हिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचा लाइफटाइम कलेक्शन हे 80 ते 90 कोटींच्या घरात जाईल असाही अंदाज व्यक्त होत आहे.