आजचे राशीभविष्य: सोमवार दिनांक १७ जून २०२४

जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 17 June 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे.

मेष राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही प्लानिंग केली होती. ती तुमच्यासाठी चांगली राहील. आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. कुणालाही पैसे उधार देऊ नका. नाही तर पैसे परत येण्याची कोणतीही शाश्वती नाही.

वृषभ राशी

गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उपयुक्त ठरेल. तुम्ही आज मोठी जबाबदारी उचलाल. कुणाशीही बोलताना तोलून मापून बोला. नाही तर तुमचे शब्द काळजाला लागतील. कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त व्हाल. त्यामुळे तुमच्यावर ताणतणाव वाढेल. नोकरीच्या ठिकाणी चूक झाल्याने तुमचा बॉस तुमची प्रमोशन रोखण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रवासाला जाण्याची तयारी करत होतात. त्यामुळे काळजी घ्या. दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी

बऱ्याच काळापासून रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. बऱ्याच काळानंतर एखाद्या मित्राशी बोलणं होणार असेल तर जुनी मढी उकरू नका. नाही तर मैत्रीत आणखीनच दुरावा निर्माण होईल. प्रवासाला जाण्याचा बेत आखाल. विरोधकांना मनातील गोष्ट सांगण्याची संधी मिळेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. बड्या लोकांशी भेटीगाठी घ्याल.

कर्क राशी

कोर्टकचेऱीच्या बाबतीत आजचा दिवस चांगला जाईल. कुटुंबात तुमचा मानसन्मान वाढेल. दिलेल्या सल्ल्यानुसार काम कराल. आज कुटुंबाच्या हितासाठी मोठा निर्णय घ्याल. उत्पन्न वाढवण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी गुंतवणूक कराल. मुलांच्या भविष्याची चिंता सतावू लागेल. त्यासाठी तुम्ही जीवनसाथीशी चर्चा कराल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची आज भक्कम साथ मिळेल. राजकाणारतील लोकांना थोडी सावधगिरी बाळगावी लागेल.

सिंह राशी

आजच्या दिवशी व्यवसायात चढउतार पाहायला मिळतील. व्यवसायात पार्टनर बनवला असेल तर त्याच्याकडून धोका होण्याची शक्यता आहे. कुणाकडून वाहन घेऊ नका. आरोग्याच्या समस्यांकडे डोळेझाक करू नका, नाही तर नंतर त्रास होईल. भाऊ किंवा बहिणीशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही वादात अडकू नका. जीवनसाथीच्या करिअरची चिंता सतावेल. त्यासाठी तुम्हाला छोटीमोठी कामे करावी लागतील.

कन्या राशी

आजच्या दिवशी तुम्हाला प्रचंड समस्या जाणवतील. तुमच्या वाणीने व्यवसायातील लोकांची मने जिंकाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची समस्या असेल तर आज ती समस्या एकत्रित बसून सोडवाल. तेच तुमच्यासाठी उत्तम असेल. घरातील व्यक्तीचं लग्न ठरेल. उधारीवर दिलेले पैसे परत मिळतील. घरातील एखादा सदस्य नोकरीच्या निमित्ताने दूर जाईल. त्यामुळे तुम्हाला त्याची काळजी वाटेल.

तूळ राशी

प्रवासाचा योग आहे. आजच्या दिवशी ताणतणाव जाणवेल. एखाद्या सरकारी योजनेचे लाभ मिळेल. कायदेशीरबाबीत अचडणी वाढतील. मालमत्तेचा व्यवहार करताना काळजी घ्या. आज चमचमीत पदार्थ खाण्याचा योग आहे. नवीन कपडे खरेदी कराल. तर महत्त्वाची वस्तू हरवेल. डोळ्यांचं दुखणं डोकं वर काढेल. शेजाऱ्यांशी भांडण होईल. आईवडिलांच्या सेवेचं फळ मिळेल.

वृश्चिक राशी

आज आनंद वार्ता ऐकायला मिळेल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगली रक्कम गुंतवू शकता. काही शारीरिक त्रासामुळे आईला जास्त धावपळ करावी लागेल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या कमी कराल, त्यामुळे तुमच्यासोबत काही फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमची एखादी गुप्त माहिती लीक होऊ शकते. प्रेमीयुगल जोडीदारासोबत लाँग ड्राईव्हवर जाण्याचा विचार करतील. खूप दिवसांनी तुमचा एखादा जुना मित्र भेटेल.

धनु राशी

आज अनेक चढउतार पाहायला मिळतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आनंद वार्ता ऐकायला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद विवाद होतील. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडाल. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या कामात बदल करावे लागतील. त्यामुळे कामात अडथळे येतील. एखाद्या गोष्टीबाबत कुटुंबाची साथ मिळेल. विद्यार्थ्यांना आज खूप मेहनत करावी लागणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.

मकर राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी समस्यांचा असेल. कुटुंबात एखादी घटना घडल्याने तुम्ही त्रस्त व्हाल. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. नाही तर समस्या वाढतील. प्रवासाला जात असताना वाहने जपून चालवा. तुमचं एखादं होऊ घातलेलं काम रेंगाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा त्रास वाढेल. बँकिंग क्षेत्रातील लोक एखाद्या बचतीच्या योजनेत पैसा गुंतवतील. त्याच त्याच चुका करू नका. एखाद्या जुन्या मैत्रीणीशी भेट होईल.

कुंभ राशी

तुमच्या मनात आज परस्पर सहयोगाची भावना असेल. तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. एखाद्या अनोळखी व्यक्तीमुळे तुम्हाला समस्या निर्माण होतील. तुम्ही पार्टनरशीपमध्ये काम कराल. तुम्हाला पार्टनरकडून धोका होण्याची शक्यता आहे. तुमच्या वाणीने तुम्ही संबंध सुधाराल. एखाद्या समस्येबाबत तुम्ही जीवनसाथीशी चर्चा कराल. जास्त गोड बोलू नका, नाही तर प्रकरण उलटण्याची शक्यता आहे.

मीन राशी

आजचा दिवस तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. तुम्ही आज एखादं नवीन काम सुरू कराल. कार्यक्षेत्रात बॉसच्या म्हणण्याकडे लक्ष द्या. तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा. तुम्हाला प्रत्येक कामात हमखास यश मिळणार आहे. तुम्ही आज काही तरी वेगळं करून दाखवाल. कामानिमित्त लांबचा प्रवास घडेल. जीवनसाथीसोबतचे मतभेद दूर होतील. तुमच्यातील संबंध पूर्वीसारखेच होतील.