सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा!

ईद उल फित्र नंतर ईद उल अजहा हा सण येतो. इस्लाम धर्मात बकरी ईदला विशेष महत्त्व आहे. या सणाला त्यागाचा सण असेही म्हणतात.बकरी ईदला मोठ्या प्रमाणात बकरी, बकरा यांची कुर्बानी दिली जाते. ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईद यंदाच्या वर्षी 17 जून रोजी आहे. “ईद-उल-अजहा” हा सण प्रेम, त्याग आणि बलिदान या भावनांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश देतो. त्याग आणि समर्पणातून मानव कल्याणाचा विचार सांगतो. याशिवाय सण साजरा करताना गोरगरीबांचाही विचार करण्यास सांगतो.

शांती आणि त्यागाचे प्रतिक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईदनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ही बकरी ईद
सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो हीच शुभेच्छा!
बकरी ईदच्या शुभेच्छा
बकरी ईद मुबारक