एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. पुढील दोन दिवसांत महाविकास आघाडीतील महत्वाचा नेता महायुतीमध्ये येणार असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं.त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, असेही ते म्हणाले. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरही त्यांनी मोठं वक्तव्य केले.
दोन दिवसांत राज्यातील मोठा नेता महायुतीमध्ये येणार असल्याचेही संकेत यावेळी संजय शिरसाट यांनी दिले. अशोक चव्हाण यांच्यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, आता वायकर, प्रभू, सुनिल शिंदे आणि माजी महापौर यांच्यापैकी कोण येतंय? हे दोन दिवसांत कळेल.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadansiv) यांनीही अनेक काँग्रेस नेते संपर्कात असल्याचं म्हटले होते.