गर्भवती महिलांना मिळणार ६ हजार…

सरकार नागरिकांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत असतात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीही सरकारच्या अनेक योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिला आपला स्वतः चा व्यवसाय सुरु करु शकतात. नवनवीन गोष्टी शिकू शकतात. अशीच महिलांसाठी राबवलेली योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना. प्रधानमंत्री मातृत्व योजना ही गरोदर महिलांसाठी राबवली जाते. या योजनेत गरोदर महिलांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. यामुळे आई आणि बाळ दोघेही सुखरुप राहतात. जाणून घेऊया या योजनेबद्दल.

अनेकदा गर्भवती (pregnant)महिलांना व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पौष्टिक आहार मिळत नाही.याचा परिणाम बाळाच्या शरीरावर होतो. कधीकधी बाळ कुपोषित राहते. त्याला आजार होऊ शकतो. त्यामुळे गरोदर महिला आणि तिच्या बाळाला योग्य पोषण मिळवून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली आहे. या योजनेतील मदतीमुळे आईला पौष्टिक आहार मिळतो.

सरकारने २०१७ मध्ये ही योजना सुरु केली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेचे वय १९ वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे. या योजनेत सरकार गर्भवती महिलांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करते. ६ हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये गरोदर महिलेला दिले जातात. सर्वप्रथम महिलेला १००० रुपये दिले जातात. त्यानंतर दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी २००० रुपये दिला जातात. या योजनेत प्रसूतीनंतर महिलेला १ हजार रुपये दिले जातात. हे पैसे रुग्णालयाकडून दिले जातात.

अशा प्रकारे ३ वेळा महिलेला पैसे दिले जातात. तुम्ही या योजनेत तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार, मजुरी करणाऱ्या महिलांना गर्भधारणेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये. त्यांच्या मुलांचे पोषण व्यवस्थित व्हावे, हा या योजनेचा उद्देश आहे. मातृत्व वंदना योजनेचा लाभ पहिल्या मुलाच्या जन्मानंतर फक्त एकदाच मिळतो.