सोलापूर लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय नेते विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. दक्षिण सोलापूर मतदारसंघात नाना पटोले यांचे कट्टर समर्थक व माजी आमदार दिलीप माने यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदार महाविकास आघाडीचा आमदार असेल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला लीड मिळाले आहे.
जनता ही भाजपच्या आमदारांना आणि भाजपच्या सरकारला वैतागली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ होईल आणि राज्यात देखील सत्ता परिवर्तन होईल, असा आत्मविश्वास दिलीप मानें यांनी व्यक्त केला आहे. खासदार प्रणिती शिंदे या सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या तीन वेळा आमदार राहिल्या आहेत. खासदार झाल्याने सोलापूर शहर मध्यमध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
काँग्रेसमध्ये अनेक इच्छुकांमध्ये रस्सीखेच होणार आहे. माजी आमदार दिलीप माने यांनी असेही म्हटले आहे की, सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेसचाच उमेदवार असेल. पण, पक्षश्रेष्ठी उमेदवार ठरवतील. मुस्लिम बहुसंख्याक असलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंना फक्त ७०९ मतांचं लीड मिळालं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तगडा उमेदवार द्यावा लागेल.