डिसेंबरपासून सात-बारावर लागणार आईचे नाव

आपल्याला अनेक सरकारी कामांसाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता हि भासतेच. अशातच सरकार अनेक नवनवीन निर्णय घेत असल्यामुळे आपली कागद्पत्रांबबत तारांबळ उडते. असाच एक शासन निर्णय डिसेंबरपासून लागू होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने आईचे नाव सात-बारावर लावण्याचा निर्णय घेतला असून, ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यापासून प्रत्यक्षात सुरू करण्यात येणार आहे.यासाठी राज्य शासन ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणार आहे.अर्थात आईचे नाव सात-बारावर दाखल करण्यापूर्वी संबंधित कुटुंबातील आईचे नाव हेच आहे का याची खातरजमा करण्यासाठी तलाठी संपूर्ण कुटुंबाला बोलावू शकतो.

तसेच आईचे नाव तपासण्यासाठी तलाठ्यांना कसरत करावी लागणार आहे.राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने महिलांच्या नावाचा अर्थात आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्याच अनुषंगाने एक मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन, सदनिका खरेदी केल्यास आईच्या त्याच्या नावासह नावाचा उल्लेख करण्यात सात-बारावर आईचे नाव येणार आहे. त्या संदर्भात आता संगणक प्रणाली राबविण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे.