धन्यकुमार बाळासो मगदूम (रा.कोंडिग्रे, ता. शिरोळ) यांचा पावरलुमचा व्यवसाय आहे. या व्यवसायातील तेजी-मंदीमुळे त्यांचे नुकसान झाले. त्यांना व्यवसायासाठी खेळते भांडवल म्हणून पैशाची गरज होती. त्यांची इचलकरंजी येथील एका एजंटची ओळख झाली. त्यांनी शरण्य अर्बन मल्टिपर्पज निधी बॅँक लि वाठार तर्फ वडगाव यांच्याकडून कर्ज मंजूर करून देतो, असे सांगितले. कागदपत्रांची पूर्तता करून घेतली.
रिजनल डायरेक्टर मिनिस्टर ऑफ काॉर्पोरेट अफेअर्स रजि.ऑफ कंपनीज यांनी दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून सभासदांना कर्जाचे आमिष दाखवले. एक कोटी कर्ज मंजूर झाल्याचे सांगून १ लाख ३८ हजार रोख रक्कम घेतली. याशिवाय कर्ज रकमेपैकी ४५ लाख रुपयांचे बॅँक ऑफ बडोदा, शाखा नागावचा चेक दिला. तो चेक नवटता परत आला. यानंतर फिर्यादींनी पेठवडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी संस्थाध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार संचालकांना पेठवडगाव पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी चेअरमन सुरेश मारुती पाटील, व्हाईस चेअरमन रवींद्र बाळासो हिरुगडे, प्रज्ञा प्रवीण भोसले, संचालक बाळासो शामराव पोवार, नंदा आनंदा पाटील, मच्छींद्र आणाप्पा कांबळे, महेश बाळासो शिंदे, विजय रंगराव कांबळे, आरती रवींद्र हिरुगडे, सुरय्या इस्माईल देसाई यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.