दर्जेदार डाळिंबाच्या उत्पादनासाठी जगाच्या नकाशावर ओळख मिळवलेल्या अजनाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सुभद्रा शंकर कोळवले तर उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे दत्तात्रय (बापू) भगवान कोळवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नूतन सरपंच सुभद्रा कोळवले यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच गावाच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ज्येष्ठ नेते अरुणभाऊ घुले उपस्थित होते.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षाची स्थानिक पातळीवर आघाडी झाली होती. आघाडीतील नेतेमंडळींनी पहिली अडीच वर्षे सरपंच पद हे शेतकरी कामगार पक्षाला दिले होते. आपल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने शेकापच्या सरपंच सुजाता विष्णू देशमुख व उपसरपंच अर्जुन येलपले यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
रिक्त झालेल्या सरपंच आणि उपसरपंच पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. २६ रोजी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी सुभद्रा शंकर कोळवले तर उपसरपंच पदासाठी बापू कोळवले यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजय (दादा) येलपले, माजी सरपंच अर्जुन कोळवले, माजी उपसरपंच अर्जुन येलपले, प्रा हणमंत कोळवले, विष्णू देशमुख, प्रल्हाद येलपले, हनुमंत देशमुख, हमू नाना येलपले, गाव कामगार तलाठी किरण बाडीवाले, ग्रामसेवक संदीप सरगर, पोलीस पाटील संतोष भंडगे, नितीन येलपले, शरद येलपले, भूषण येलपले, कोतवाल नवनाथ इंगोले, ग्रामपंचायत सदस्य अनिता पवार, चंद्रकांत पवार, माणिक देशमुख, अर्जुन येलपले, महादेव भंडगे, चंद्रकांत कोळवले तेजस्विनी चव्हाण, द्रोपदी शेंबडे, दिपाली लाडे, रेश्मा भंडगे यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.