मंगळवेढा तालुक्यात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. सगळ्यांना एक आदर्शच घालून दिलेला आहे. मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळाच्या वतीने मिरवणुकीवरील अनावश्यक खर्चाला फाटा देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तब्बल 162 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करून एक विधायक उपक्रम जोपासण्याचे काम केले.
अलीकडच्या काळात शिवजयंतीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आले आहे त्यामुळे मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात शिवजयंतीच्या निमित्ताने बौद्धिक, सांस्कृतिक ,धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमातून लोकांचे प्रबोधन व मनोरंजन होत असले तरी हे उपक्रम तालुक्यातील नागरिकांना दिशा दायक ठरणारे आहेत मात्र अंतिम दिवशी शिवजयंती शहर व तालुक्यातील जल्लोष मिरवणूक काढल्या जातात या मिरवणुकीवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो यातून कर्णकर्कश डीजे, हलगी, बँड ,फटाके याच्या तालावर तरुणाई थिरकली जाते.