मंगळवेढा शहरातील विविध विकास कामे खोळंबली असून आलेला निधी माघारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशी लेखी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अजित जगताप यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, सांस्कृतिक भवन कामाचे वर्क ऑर्डर देऊनही शासकीय दबावापोटी ठेकेदारास लाईन आऊट न दिल्यामुळे काम सुरू झाले नाही सदर कामास मिळालेला 7 कोटी निधी परत जाण्याची शक्यता असल्याने यास नगरपरिषद इंजिनियर सोनटक्के यांना जबाबदार धरून निलंबित करण्यात यावे सदरचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर विकसित करणे या निविदेश जाणून बुजून राजकीय दबाव पोटे वारंवार मुदतवाढ देऊन सदरचे काम आचारसंहिता लागेपर्यंत रखडून ठेवणारे अधिकाऱ्यावरती कारवाई करून सदरचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळा परिसर सुशोभीकरण करणे कामाचे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून जाणून-बुजून राजकीय दबाव पोटी सर्व प्रक्रिया रद्द करण्यात आली नंतर फेरनिविदा काढून आचारसंहितेमध्ये सदर काम रखडून ठेवण्याचे अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे सदरचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे.अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून साठे नगर व भीमनगर साठी पाण्याच्या टाकीचे काम गेले तीन वर्षे झाले अद्याप पूर्ण नाही त्यामुळे दलित वस्तीत पाण्याची टंचाई होत आहे.
तरी तात्काळ सदर काम सुरू करून पाणीपुरवठा करण्यात यावा.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र नवीन इमारत येथे फर्निचर करणे, ई लायब्ररी करणे काम जाणीवपूर्वक न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ते कारवाई करण्यात यावी.सांगोला रोड ते बोराळ नाका या रस्त्याचे काम वर्ष झाले तरी पूर्ण नाही नागरिकांची हेळसांड होत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांवर ते कारवाई करावी वरून रस्त्याचे काम तात्काळ करणे ही विनंती.