तुम्हीही तुमच्या घराच्या छतावर करा भाजीपाल्याची शेती! होईल बचत

मित्रानो सध्या महागाई खूपच वाढली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून भाजीपाला पर्यंत सगळ्यांचेच भाव गगनाला पोहचले आहेत. टोमॅटोच्या किमतीने तर साऱ्यांना बेजार केले आहे. तर मित्रानो तुम्ही घरच्या घरी हजारो रुपयांची बचत करू शकता म्हणजेच काय? तर तुम्ही तुमच्या घराच्या टेरेसवर भाजीपाला करून हजारो रुपये वाचवू शकता. यासाठी थोडीसी मेहनत करावी लागेल.

अलीकडे टेरेस फार्मिंगचे प्रमाण वाढत आहे. टोमॅटो, हिरवी मिरची, काकडी, वांगे यासह इतर भाजीपाला काढता येऊ शकतो. यामुळे लोकांना ताजा आणि हिरवा भाजीपाला मिळेल. महागाईच्या दिवसांत हजारो रुपयांची बचत होऊ शकेल.

घरी शेती करत असाल तर २१ बाय २१ इंचीच्या १० कुंड्या खरेदी कराव्या लागतील. माती, शेण टाकून टोमॅटोची लागवड करू शकता. मध्यंतरी पाणी द्यावे लागते. अडीच महिन्यानंतर टोमॅटोचे उत्पादन सुरू होते. पुसा हायब्रीड २, पुसा हायब्रीड ४ अशा जातीचे टोमॅटो लावता येतील. या जातीच्या टोमॅटोचे चांगले उत्पादन मिळते. घराच्या छतावर टोमॅटो काढल्यास महिन्याचे हजार रुपये वाचवू शकता.

बाजारात शिमला मिरची खूप महाग झाली आहे. टोमॅटोप्रमाणे शिमला मिरचीसुद्धा घरी काढू शकता. यासाठी तुम्हाला २१ इंज बाय २१ इंचीच्या कुंड्या खरेदी कराव्या लागतील. त्यात माती भरून शिमला मिरची सोलन हायब्रीड २ आणि ओरोबेल जातीच्या शिमला मिरच्या लावता येईल. बीज लावल्यानंतर ६० ते ६५ दिवसानंतर उत्पादन सुरू होईल. दहा कुंड्यांमध्ये शिमला मिरची लावत असाल तर ६५ दिवस रोज एक किलो शिमला मिरची मिळेल.