अनेक गावागावात अलीकडच्या काळात अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. वाठार तर्फ वडगाव येथे अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एम. जे. चषक ओपन रबर बॉल क्रिकेट स्पर्धा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत.
यातील विजेत्यांना अनुक्रमे ४१ हजार, तर उपविजेत्याला २५ हजार, तृतीय व चतुर्थ ७ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धा वाठार येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर होणार आहेत. यासाठी अमोल लठ्ठे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महेश जगताप यांनी केले आहे.