शेअर बाजारातून (share market) एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. शेअर बाजाराने एक नवा इतिहास रचला आहे. सेन्सेक्सने (sensex) पहिल्यांदाच 80 हजारांचा टप्पा पार केला आहे.काल देशांतर्गत बाजारात थोडीशी घसरण झाली होती.
पण आज व्यवसाय मजबूत राहण्याची चिन्हे दिसत आहेत.शेअर बाजाराने आज एक नवीन विक्रम केला आहे. सेन्सेक्सने 80,039.22 अंकांची विक्रमी पातळी गाठली आहे. तर निफ्टीने 24,291.75 अंकांचा टप्पा ओलांडला आहे.
सकाळी 9.20 वाजता सेन्सेक्स 358.44 अंकांच्या (0.45 टक्के) वाढीसह 79,800 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. तर निफ्टी 107.80 अंकांच्या (0.45 टक्के) वाढीसह 24,232 अंकांच्या जवळ होता.