IND vs AUS: तिसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, सामना पहाटेच सुरु होणार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्या सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबरपासून गाबाच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे.गाबाच्या मैदानावर भारताने मागील दौऱ्यात मालिका जिंकली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना बदललेल्या वेळी सुरू होणार आहे. दुसरा सामना सकाळी 9.30 वाजता सुरु झाला होता, मात्र तिसरा सामना पहाटेच सुरु होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना पहाटे उठावे लागणार आहे. गाबा येथे होणारा तिसरा सामना पहाटे 5.50 वाजता सुरू होईल. पहिल्या दिवशी नाणेफेक त्याच्या अर्धा तास आधी म्हणजे सकाळी 5.20 वाजता होईल. उर्वरित दिवसासाठी सामना 5:50 वाजता सुरू होईल. सध्या, भारतात हिवाळा आहे आणि लोक सहसा सकाळी उशिरा उठतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मॅच पाहण्याची आवड असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठावे लागेल.