मराठा समाजाची आजपासून शांतता रॅली सुरु…..

राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणासाठी, सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी आता आक्रमक वाटचाल करण्यात येत आहे. त्यासाठी मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला आजपासून हिंगोली येथून सुरुवात होत आहे. मराठा समाजाची एकजूट दाखविण्यासाठी ही रॅली काढण्यात येत आहे. पण या रॅलीत काही जण अशांतता माजविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांनी राज्यातील बड्या नेत्यावरच या रॅलीला गालबोट लावण्याचा आरोप केला आहे.

पाच टप्प्यात रॅली

हिंगोलीपासून मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला सुरुवात होत आहे..5 टप्यात ही जनजागृती रॅली वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि आरक्षणासाठी मराठा बांधवानी आतां बाहेर पडावे आणि यात शांततेच्या मार्गाने सहभागी होऊन आपली एकजूट दाखवून द्यावी अशी विंती जरांगे पाटील यांनी केली आहे. आपला एक दिवस करोडो मराठा बांधवाच्या मुलाचं भविष्य उज्वल करणारा आहे, असे आवाहन त्यांनी केले.

या आहेत मागण्या

संगे सोयरे अंमलबजावणी झाली पाहिजे. हैद्राबाद गॅजेट लागू झालं पाहिजे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे या मागण्यासाठी शांतता रॅली काढण्यात येत आहे. कोणताही ही नेता अंतरवली येथे आला तरी मी त्याचा होणार नाही. आपण शेवटपर्यंत समाजाचाचे राहणार आहोत. त्यामुळे किती आले किती गेले तरी समाजाच्या मनात काही शंका नाही. मराठ्याची कुणबी ही पोट जात का होत नाही यावर अशोक चव्हाण यांच्या सोबत चर्चा झाली ते म्हणाले आम्ही सरकारशी बोलून तोडगा काढतो, अशी माहिती त्यांनी दिली.